कुंडल येथील सूर्योपासणा मंदीराने औंध संस्थान काळात प्रतिष्ठीत राजे-महाराजेंचा सहवास अनुभवला आहे. औंध संस्थानची स्थापना १६९९ साली झाली, यातीलच भवानराव पंतप्रतिनिधी हे ४ नोव्हेंबर १९०९ ते १५ ऑगस्ट १९४७ या कालावधीत राजे होते. हे संस्थान ७२ खेडी आणि ४८ वाड्यांमध्ये विस्तारले होते. भवानराव पंतप्रतिनिधींना सुर्यनमस्काराची विशेष आवड होती, त्यांच्या मते सूर्य उपासनेने सर्वांगात एक ऊर्जा निर्मिती होते. त्यामूळे त्यांनी पुर्ण संस्थानात अशी सूर्योपासना मंदीरे स्थापन केली आणि जनतेला सूर्यनमस्काराचे महत्व पटवून स्यांच्याकडून हे करवून घेतले जाऊ लागले, तसेच शाळांमध्येही याचे महत्व समजावून देत विद्यार्थ्यांच्या शालेय जिवनापासून त्याचे महत्त्व पटवून देण्यात भवानरावांचा मोलाचा वाटा होता. सूर्यनमस्काराची महती त्यांच्यामुळेच संपूर्ण जगाने मान्य केली. या त्यांच्या सूर्यनमस्कारावरील प्रेमाकडे पाहुन आचार्य प्र.के.अत्र्यांनी " साष्टांग नमस्कार "हे नाटकही लिहले होते. अशा संस्थान कालीन ऐतिहासिक वास्तूंपैकी एक वास्तू कुंडल येथे आहे. या सूर्योपासना मंदीरात राजांनी बसवलेली बुध्दी आणि यष्टीचे दैवत हनुमानाची दगडातील कोरीव मुर्तीही आहे.
    संस्थाने खालसा झाली, त्यानंतर या ऐतीहासीक वास्तू त्या त्या गावातील ग्रामपंचायतींना वर्ग करणेत आल्या. त्या वास्तुविषयीची सर्वती जबाबदारी त्यांच्याकडे सोपावण्यात आली. काळानुरुप व्यायामाकडे लोकांच्यातून दुर्लक्ष होत गेले, तसेच ती सूर्यनमस्कारांबाबतही जागरूकता कमी होत गेली, त्यामूळे अशा वास्तू दुर्लक्षीत राहू लागल्या. वास्तविक या ऐतिहासिक वास्तूची डागडुजी होऊन वास्तूची पवित्रता आबाधीत ठेवणे आवश्यक आहे. आज कुंडल येथील हे सूर्योपासना मंदीर पुर्ण मोडकळीस आहे, अतिवृष्टीमूळे जून्या जिर्ण झालेल्या भिंती ढासळत आहेत, छतावरील कौले माकडांच्या उच्छादामूळे फुटून, घाणीचे आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहे. अशा ऐतिहासिक आणि आपली वैभवशाली परंपरा सांगण्या-या या वास्तूचे पुनरुज्जीवन झाल्यास नवीन पिढीला सूर्योपासनेचे धडे देण्यासाठी मंदीर नव्याने सज्ज होईल.
    कुंडल हे गाव औंध संस्थानची राजधानी म्हणून ओळखल जायचं त्यामुळ कुंडल पोलीस स्टेशन ची इमारत ही औंध संस्थानच्या राजांच्या मालकीची होती . ही इमारत त्यांनी राजधानीमध्ये काही कारणात्सव आल्यास आरामासाठी बांधलेला बंगला म्हणून जुनी लोक ओळखतात. नंतर त्यांनी हा बंगला पोलीस कचेरीच्या ताब्यात दिला आता त्या ठिकाणी कुंडल पोलीस स्टेशन स्थित आहे असा त्या ठिकाणचा इतिहास आहे अस लोक सांगतात.