Responsive image
  आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा.       गटारी वाहत्या ठेऊन आपले कुटुंब आरोग्य संपन्न ठेवा.       विचार करा एकाचा, मार्ग कुटुंब कल्याणाचा.       वैयक्तीक शौचालयाचा वापर करावा.       पिण्याच्या पाण्याचा वापर योग्य करा.       नळ कनेक्शनला चावीचा वापर करावा.       प्लास्टिकचा वापर करू नये.



ग्रामपंचायत कुंडल ता. पलूस जि. सांगली


ऐतिहासिक आणि पौराणिक ठिकाणे



तीन महादेव मंदिर

    कुंडलचा राजा सत्येश्वर यांना गौतम ऋषींच्या शापामुळे संध्याकाळी शरीरावर व्याधी होत असायची काही दिवसानंतर सध्याचा सागरेश्वर येथे राजा शिकारीसाठी गेला असता दुपारी विश्रांतीच्या वेळेला त्यांनी त्या कुंडात हात पाय धुतले. राजा घरी गेल्यानंतर राणीच्या लक्ष्यात आले कि जेवढे शरीर त्या कुंडातील पाण्याने भिजले त्या ठिकाणची व्याधी नष्ट झालेली समजली व राणीने चौकशी केली असता त्या ठिकाणचा पत्ता घेऊन राजाचे सर्व शरीर त्या पाण्याने स्वच्छ केले रोग पूर्णपणे बारा झाला.

    ही सगळी घटना घडल्यानंतर राणीने एक मन तांदूळ तेथील पिंडीना वाहिले ते तांदूळ वाहत असताना तीन पिंडीना तांदूळ पुरवटी आले नसल्याने जे तीन महादेव होते ते सत्यश्वर राजाच्या पांढरीत येऊन राहिले अशी आख्यायिका आहे.




१२ वर्षातून एकदा येणारी भागिरर्थी

    कुंडल मध्ये तीन महादेव मंदिराजवळ १२ वर्षातून एकदा भागिरर्थी उगम पावते. कन्या राशीस गुरु आल्यानंतर तीन महादेव मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीला पाजर फुटतो आणि मागील बाजूस भागिरर्थी उगम पावते.

    जे येणारे पाणी आहे त्याचा औद्योगिक पद्धतीने जरी उपसा केला तरी एक वर्षभर पाणी कमी होत नाही. पाण्याची चव देखील अमृतासारखी असते अस म्हणलेलं वावग ठरणार नाही. पाणी आलेल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी ओटी भरली जाते. हा उत्सव १२ वर्षातून एकदा येत असल्याने लोक खूप लांबून ते पाहण्यासाठी येऊन पाण्याने स्नान करून पावित्र्य मिळवतात. आता येणारी भागिरर्थी २०२८ साली येईल.