Responsive image
  आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा.       गटारी वाहत्या ठेऊन आपले कुटुंब आरोग्य संपन्न ठेवा.       विचार करा एकाचा, मार्ग कुटुंब कल्याणाचा.       वैयक्तीक शौचालयाचा वापर करावा.       पिण्याच्या पाण्याचा वापर योग्य करा.       नळ कनेक्शनला चावीचा वापर करावा.       प्लास्टिकचा वापर करू नये.



ग्रामपंचायत कुंडल ता. पलूस जि. सांगली


गावामधील साहित्यिक आणि सांस्कृतिक सेवा


कै. विजयकुमार दादा लाड सार्वजनिक वाचनालय कुंडल

    शिवाजी गडचे सार्वजनिक वाचनालयाची स्थापना १८ ऑक्टोबर १९७६ रोजी विजयकुमार दादा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. सध्या हेच वाचनालय कै. विजयकुमार दादा लाड सार्वजनिक वाचनालय या नावाने कार्यरत आहे. या वाचनालयात तब्बल ४००० ग्रंथ संपदा उपलब्ध आहे.


संवाद मंच कुंडल

    श्री. अशोक (दादा) पांडुरंग पवार यांच्या अध्यक्षतेखाली मागील १८ वर्ष्यांपासून ही संस्था कार्यरत आहे. कुंडल गावातील होतकरू कलाकारांना संधी निर्माण करून देणे आणि राज्यभरातील नामवंत कलाकारांना आमंत्रित करून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे हा या संस्थेचा मुख्य हेतू आहे.


शब्दगंध साहित्य सेवा मंडळ कुंडल

    शब्दगंध साहित्य सेवा मंडळ कुंडल ही संस्था कै. विजयदादा लाड वाचनालयाशी संलग्न काम करते. नवनवीन साहित्यिकांना प्रोत्साहन देणे त्यांना व्यासपीठ मिळवून देणे आणि त्यांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी मार्गदर्शन करते. त्याचबरोबर साहित्यिक चर्चा घडवून आणणे हा या संस्थेचा मुख्य हेतू आहे.


महेंद्र आप्पा लाड सार्वजनिक वाचनालय कुंडल

    महेंद्र आप्पा लाड सार्वजनिक वाचनालय हे मागील १० वर्ष्यांपासून कार्यरत आहे.