कुंडल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शरदभाऊ लाड युवा प्रतिष्ठान मार्फत उभा केलेला भव्य शामियाना. येथील मानाची समजली जाणारी शरदभाऊ लाड युवा प्रतिष्ठानची छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीचे प्रत्येक वर्षी दिमाखात आयोजन व नियोजन केले जाते.
    यंदा किल्ले सिंधुदुर्ग येथून प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ज्योत आणण्याचे नियोजन आहे या ज्योतीचे 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता बस स्थानकावर स्वागत होणार आहे. 8 वाजता महाराजांची मूर्ती वाजत गाजत शिवतीर्थ स्थळी आणली जाईल आणि प्रतिष्ठापना केली जाईल. सायंकाळी 4 वाजता साहसी मैदानी खेळांचे आयोजन उभा केलेल्या भव्य शामियान्या समोर होईल आणि 6 वाजता शिवजन्म पाळणा सोहळा संपन्न होईल रात्री महाआरती केली जाईल. दुसऱ्या दिवशी दि 20 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवाद्य संगीतामध्ये भव्य मिरवणूक गावातुन ढोल-ताषा, हालगी, मर्दानी खेळ, भव्य आतिशबाजी, विद्युत दिव्यांच्या झगमगाटात सुरु होईल.अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरदभाऊ लाड यांनी पत्रकार परीषदेत दिली. तसेच कुंडल आणि परिसरातील सर्व शिवभक्तांनी या दिमाखदार सोहळ्या मधे उत्स्फुर्त सहभाग घ्यावा आणि या दोन्ही दिवसाच्या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन ही प्रतिष्ठान तर्फे करणेत आले आहे.
    यावेळी क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्रीताई लाड यांच्या पुढाकाराने शेकडो महिलांनी छत्रपतींची महाआरती केली आणि पाच महिलांनी त्यांचे स्व लिखित पाळणे सादर केले. हा छत्रपतींचा जन्म सोहळा पाहण्यासाठी परिसरातून हजारो नागरिक, महिला उपस्थित होत्या.
    कुंडल परिसरात शरदभाऊ लाड युवा प्रतिष्ठाणची शिवजयंती मानाची समजली जाते, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराजांचा 60 फूट लांबीचा प्रशस्त शामियाना उभा केला आहे, यंदा किल्ले सिंधुदुर्ग येथून शिवज्योत आणण्यात आली होती. संपूर्ण गावात विद्युत रोशनाई करून पूर्ण गाव भगवे केल्याने शिवजयंतीचा उत्साह तरुणांसह महिला आणि अबाल वृद्धांमध्ये ही होता.
    दि. 20 रोजी सायंकाळी 5 वाजता महाराजांची सुवाद्य संगीतात भव्य मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत आमदार अरुणअण्णा लाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, जिल्हा परिषद गट नेते शरद लाड, राजेंद्र लाड, रणजित लाड, अमरदीप लाड, विक्रांत लाड यांचेसह हजारो शिवभक्तांनी सहभाग घेतला.