१८८५ सालापासून लोकमान्य टिळकांनी राबवलेल्या गणेशोत्सव आणि शिवजयंती या दोन सणांची प्रेरणा घेऊन कुंडल गावामध्ये सर्व नागरिकांनी १९२२ सालापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. लोकमान्यांची घेतलेली प्रेरणेने गावामधील सगळ्या जातीचे लोक एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करू लागले. आजतागायत हा उत्सव गावामध्ये साजरा केला जातो. कुंडल सार्वजनिक उत्सव मंडळाला १०१ वर्ष पूर्ण झाले आणि परंपरा जोपासली जाते.
    गणेश उत्सवाचा महत्वाचा भाग हा कि अनंत चतुर्थी ला सगळे गणपती विसर्जित होतात. पण हा सार्वजनिक गणपती अनंत चतुर्थी नंतर येणारा जो शनिवार असायचा त्या दिवशी विसर्जित केला जायचा आणि सकाळची पहाट जो रविवार असतो त्या दिवशी कुंडल गावची यात्रा असते आणि त्या दिवशी लोक वर्गणीतून होणारे कुस्ती मैदान संपूर्ण देशातील मोठ कुस्ती मैदान म्हणून ओळखल जात. पण आत्ताची महत्वाची बाब म्हणजे काही कारणात्सव ही येणारी कुंडलची यात्रा आणि होणारे कुस्ती मैदान हे गणेश जयंती नंतर येणाऱ्या शनिवारी, रविवारी ठेवले गेले आहे.